जळगाव लाईव्ह न्यूज। २५ एप्रिल २०२२ । पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घरावर डल्ला मारून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. तब्बल २ लाख ८३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, मुकुंदा आनंदा पाटील (वय-५१) रा. लोहारी बुद्रुक ता. पाचोरा जि. जळगाव हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणामुळे कुटुंबीय हे छतावर गच्चीवर झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत, कपाटातून सोन्याचे दागिने व रोकड असा २ लाख ८३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कुटुंब जागे झाले तेव्हा उघडकीला आला. याप्रकरणी मुकुंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.