⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | Chalisagaon: गावठी कट्ट्याशी खेळ महागात पडले! बंदुकीतील गोळी थेट तरुणाच्या गालात घुसली

Chalisagaon: गावठी कट्ट्याशी खेळ महागात पडले! बंदुकीतील गोळी थेट तरुणाच्या गालात घुसली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२४ । चाळीसगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणेज २० वर्षीय युवक गावठी कट्ट्याशी आरशा समोर खेळत असताना, चुकून गोळी झाडली गेल्याने ती थेट गालात घुसली आहे. यात तो जखमी झाला असून त्याला तत्काळ रुग्ण्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मंजितसिंग दिलीपसिंग बावरी (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
या घटनेने बाबत असे की, चाळीसगाव शहरातील बस स्टॅण्डच्या पाठीमागे मंजितसिंग बावरी हा त्याची आई व बहीणीसह भाड्याने राहतो. शुक्रवारी सकाळी मंजितसिंग हा त्याच्या हातातील बंदुक ही आरशात बघुन वेगवेगळ्या स्टाईलने हवेत फिरवित होता. त्यावेळी बंदुकीतील गोळी चुकून झाडली गेल्याने ती थेट गालात घुसली आहे.

यावेळी वेळी घरातून जोरात फटाका फुटल्यासारखा आला. तेव्हा मित्र व वडील हे घरात पळत गेले असता, मंजितसिंग हा आरशा समोर गुडघे जमिनीवर टेकून डाव्या गालाला हात लावून खाली बसलेला होता. तसेच डाव्या गालातून रक्त येत होते. मित्राने लागलीच त्याच्या आई व बहीणीस बोलावुन घेतले व त्यांना झालेला प्रकार सांगितला. यानंतर त्याला देवरे हॉस्पिटल येथे उपचाराकामी घेऊन गेले. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिसांनी रुग्णलयात धाव घेवून घटनेची माहिती घेतली.

याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला पो. उपनिरिक्षक कैलास राजधर पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि. योगेश माळी करीत आहेत. दरम्यान मंजित याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस दलाकडून मिळाली

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.