जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२४ । जळगावमधील रावेर तालुक्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. दारू पिऊन नशेत असलेल्या एका ६५ वर्षीय वयोवृध्दाने पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.
रावेर तालुक्यातील एका गावातील पीडित चिमुरडी हि तिच्या आजीच्या घरी मागील एक महिन्यापासून राहत होती. दरम्यान १८ फेब्रुवारीला दुपारी घरात कोणीही नसताना संशयित ६५ वर्षीय वयोवृध्दाने पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, संशयित हा गोलवाडे (ता. रावेर) येथील रहिवासी आहे. घडला प्रकार मुलीने घरात सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.
या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. त्यास रावेर न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे तपास करीत आहेत.