⁠ 
बुधवार, जानेवारी 8, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेर : 10वीचा पेपर देण्यासाठी ‘ती’ घरातून निघाली, पण… अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

अमळनेर : 10वीचा पेपर देण्यासाठी ‘ती’ घरातून निघाली, पण… अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२३ । जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना अमळनेर तालुक्यातून समोर आलीय. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारवड पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातीलएका गावात १७वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. इयत्ता दहावीत शिकत असल्याने सध्या तिचे दहावीची परिक्षा सुरू आहे. सोमवारी २० मार्च रोजी पिडीत मुलगी ही दहवीचा पेपर देण्यासाठी सकाळी घरून निघाला. पेपर दिल्यानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत तिला फूस लावून अपहरण केले. सायंकाळपर्यंत पिडीत मुलगी ही घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला.

परंतू तिचा कुठेही शोध लागला नाही. अखेर मंगळवारी २१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.