अत्यंत दुर्दैवी! सर्पदंश झाल्याने १३ वर्षीय बालकाला मृत्यू

सप्टेंबर 9, 2023 11:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२३ । धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथील करण राजू बारेला (वय-१३) या बालकाला सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या

snakebite jpg webp webp

करण बारेला हा आईवडील आणि दोन भावांसह वास्तव्यला आहे. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता करण बारेला हा आपल्या काकू यांच्यासोबत पाळधी शिवारातील शेतात निंदण्यासाठी गेला होता. दुपारी ४ वाजता शेतात काम करत असताना त्याला सर्पदंश झाला, त्यामुळे त्यांतील शेतातील मजुरांनी त्याला तातडीने खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना रात्री साडेआठ वाजता बालाचा मृत्यू झाला होता.

Advertisements

या घटनेबाबत सुरुवातीला जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर ही नोंद धरणगाव पोलीसात झीरो नंबरने वर्ग करण्यात आली. त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अकस्मात अकस्मात स्मृतीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ उमेश भालेराव करीत आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now