⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोंबला! आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर सोने चांदीचे दर पुन्हा विक्रमी दिशेकडे.. आताचे भाव पाहिलेत का?

बोंबला! आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर सोने चांदीचे दर पुन्हा विक्रमी दिशेकडे.. आताचे भाव पाहिलेत का?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 29 मे 2024 | सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव मध्ये ऊन्हा बरोबरच सोने-चांदीचे दरही वाढतच जात आहेत. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सोने-चांदीने तोरा पुन्हा विक्रमी पातळीकडे जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरात होणाऱ्या चढ उतार याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेतही दिसून येतो. सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही धा्तूंचे दर वाढले. सोन्या दरात 300 रुपयाची तर चांदीने देखील किलोमागे तब्बल १४०० रुपयांची उसळी घेतली.

आगामी दोन महिने लग्नसराई नसल्याने सोन्याची मागणी घटली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दोन्ही धातूंनी मोठी झेप घेतली असल्यानी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या खिशाला दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे.

आताचे दर तपासून घ्या..
सोने चांदीचे घसरलेले दर सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सोने 300 रुपये तर चांदी किलोमागे दोन हजार रुपयांनी महागले. यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 72,400 रुपये प्रति तोळ्यावर आला आहे. त्याचसोबत चांदी 93,000 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. ही दरवाढ इजराइल हल्ल्याचा परिणाम असल्याचे चांदीच्या घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.