जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२४ । मागील गेली काही दिवस सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून आली. सततच्या वाढीने चांदीच्या दराने इतिहासात पहिल्यांदाच ९० हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. सोन्यात ही वाढ दिसून आली. लग्नसराई नसताना सोने, चांदीच्या भावात झालेली वाढ सर्वांसाठी चक्रावून टाकणारी आहे. मात्र आता सोन्या चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगाव सुवर्णपेठेत एकाच दिवसात चांदी दरात तब्बल २००० रुपयापर्यंतची घसरण झाली तर सोने दरातही १००० रुपयापर्यंतची घसरण झाली.
यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७३,३०० रुपये प्रति तोळ्यावर आला आहे. तर चांदीचा एक किलोचा विनाजीएसटी ९०,००० रुपयांवर आला आहे. त्यामुळं आज सोने चांदी खरेदी करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव विनाजीएसटी ७४,४०० रुपये प्रति तोळ्यावर होता. २० मे रोजी सोने ५०० रुपयांनी महागले. २१ मे रोजी ४०० रुपयांनी किंमती उतरल्या. बुधवारी १०० रुपयाची किरकोळ घसरण झाली. गुरुवारी ११०० रुपयांनी भाव घसरले. यामुळे आता सोन्याचा दर ७३,३०० रुपयावर विकले जात आहे. दुसरीकडे या आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदीचा दर ९०,००० रुपयांवर होता. मात्र त्यात मंगळवार आणि बुधवारी मोठी वाढ होऊन चांदी विनाजीएसटी ९२००० रुपयांवर पोहोचली. परंतु गुरुवारी दिवसभरात चांदी दरात तब्बल २००० रुपयाची घसरण झाली.