⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त, मात्र चांदी महागली ; जळगाव सुवर्णपेठेत आता इतका आहे भाव?..

सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त, मात्र चांदी महागली ; जळगाव सुवर्णपेठेत आता इतका आहे भाव?..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२४ । मार्च-एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीनी दरवाढीचा कहर केला होता. गेल्या महिन्यात दोन्ही धातूंच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाली होती. मे महिन्यात अजून सोने आणि चांदीला मोठी मुसंडी मारता आलेली नाही. या आठवड्यात सलग दोन दिवस सोने स्वस्त झाले आहे. मात्र दुसरीकडे चांदी महागलेली दिसून आली

जळगाव सुवर्णपेठेत मंगळवारी सोने २०० रुपयांनी घसरून ७२७०० रुपये तोळ्यावर आले. तर चांदीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ होत ती ८५ हजारांवर पोहोचली. गेल्या गुरुवारी ७२ हजार रुपये तोळा असलेले सोने दुसऱ्या दिवशी १३०० रुपयांनी वाढले.

या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी २०० रुपयांची घसरण होत सोने ७२७०० रुपये तोळा झाले आहे. दुसरीकडे चांदीचे गेल्या गुरुवारी ८३ हजार रुपये किलो असलेले दर सोमवारी ८४००० हजारांवर होते. ते मंगळवारी ८५ हजारांवर पोहोचले

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.