⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | प्रतिकूल परिस्थितीमध्येही केळी बाग जोपासली, पण.. ; महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

प्रतिकूल परिस्थितीमध्येही केळी बाग जोपासली, पण.. ; महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२४ । आधीच वाढत्या तापमानामुळे केळी बागांना मोठा फटका बसत असून यातच बोर्ड नुसार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशातच न्हावी शिवारात शेतात वीज तारांच्या शॉर्टसर्किटमुळे केळी बागेला आग लागल्याची घटना घडली. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकरी लहू इच्छाराम भोगे यांच्या मोर नदीवरील न्हावी शिवारात तीन हजार केळीच्या खोडांना विद्युत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात कापणीला आलेल्या केळी बागेचे व त्यामध्ये असलेल्या ठिबक नळ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ही आग लागली, याची माहिती मिळताच सरपंच फैजपूर नगर दलास देवेंद्र चोपडे यांनी परिषदेच्या अग्निशमन दूरध्वनीवरून संपर्क साधल्याने वेळीच अग्निशमन बंब व त्यासह कर्मचारी नितीन रमेश नारखेडे, हेमंत विलास फेगडे घटनास्थळी येऊन यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करून रात्री आग आटोक्यात आणली. त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांचे नुकसान टळले असल्याची माहिती मिळाली. न्हावी येथील तलाठी अजय महाजन यांच्याशी संपर्क केला असता, पंचनाम्याची माहिती मिळाली

नुकसान भरपाईची मागणी…
यंदा प्रत्येक पिकावर अवकाळीची अवकृपा राहिलेली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये भोगे यांनी केळी बाग जोपासली. पण महावितरणच्या हलगर्जीपणामुळे त्यांचे नुकसान टळले नाही. विद्युत तारांच्या घर्षणामुळे झालेल्या दुर्घटनेत त्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे भोगे यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत,

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.