१ जूननंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार की उठणार? आरोग्यमंत्र्याने दिले ‘हे’ संकेत
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ब्रेक दि चेन अंतर्गत लॉकडाऊन लावण्यात आला असून त्याची मुदत ०१ जून ला समाप्त होत आहे. यानंतर राज्यात लॉकडाऊन वाढणार की उठवला जाणार असा प्रश्न जनेतला पडला आहे. अशातच ०१ जून नंतरचा राज्यातील लॉकडाऊन उठवणार हा विषय अजिबात नाही. आहे तो लॉकडाऊन वाढवायचाय पण त्याच्यामध्ये शीथिलता निश्चित द्यायची आहे. निर्बंध आणि लॉकडाऊनचे स्वरुप कसे असावे यााठी येत्या दोन दिवसांत टास्क फोर्स, आरोग्य विभाग व मुख्यमंत्री हे चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
दरम्यान, राजेश टोपे यांनी आजे दिलेल्या या माहितीवरून असे स्पष्ट होते की महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मात्र आगामी महिन्यात म्हणजे जूनमध्येही लॉकडाऊनला सोमोरे जाण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज, 27 मे रोजी बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन व कोरोना संदर्भातील उपाययोजनेवर चर्चा झाली. कॅबिनेट बैठकीनंतर आज सायंकाळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील प्रसारमाध्यमांना माहिती दिली. टोपे म्हणाले की, सरसकट लॉकडाऊन उठवणार हा विषय अजिबात नाही. लॉकडाऊन जो आज आहे कंटिन्यू राहून त्याच्यामध्ये शीथिलता देण्यात येणार आहे.