जळगावात एमआयडीसीत केमिकल कंपन्यांना भीषण आग ; अनेक कर्मचारी अडकल्याची भीती
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२४ । जळगाव शहरातील एमआयडीसीमधील मोरया ग्लोबल कंपनीसह दोन केमिकल कंपन्यांना भीषण आग लागल्याची घटना आज १७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सुमारास घडली. यावेळी कंपनीतून विविध प्रकारचे स्फ़ोट होत असल्याने परिसरामध्ये भयाचे वातावरण आहे. दरम्यान, दोन कंपन्यामध्ये ही आग भडकली असून आठ ते दहा जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
घटनेत करण जगबिर संधू (वय २०, रा. अमरावती) आणि उमेश जगदीश कोळी (वय ३० रा. यावल) हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत असे की, जळगावातील एमआयडीसीमधील मोरया ग्लोबल कंपनीसह दोन केमिकल कंपन्यांना भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी १७ रोजी घडली. घटनास्थळी जळगाव महानगरपालिका व इतर अग्निशमन दलाचे बंब दाखलं झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल असून नागरिकांच्या मदतीने मदत कार्य करीत आहेत. दरम्यान आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून दोन्ही कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
कंपनीत आठ महिला व काही कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात जळगाव तालुक्यातील आव्हाने गावातील तीन जणांचा समावेश आहे. त्यापैकी मंगल पाटील याला बाहेर काढण्यात आले आहे. समाधान नारायण पाटील हा युवक मध्ये अडकला आहे.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/7407863932600852