⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

सोने घेणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ; जळगावात आता कुठवर पोहोचला भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२४ । आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीचा ओघ वाढल्याने उच्चांकी पातळीवर गेलेल्या सोन्याचे दर खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी २०० रुपयांची घसरण झाली. त्यात आणखी घसरण होण्याचा अंदाज होता. मात्र, शुक्रवारी चीनचा महागाईचा तिमाही अहवाल जाहीर झाला. त्यात महागाईत वाढ झाल्याचे समोर आल्याने अचानक सोन्याने उसळी घेत दरात १४०० रुपयांची वाढ झाली.

यामुळे सर्वसामान्यांना सोने घेणे आता आवाक्याबाहेर झाले असून जळगावात २४ कॅरेट सोन्याचा भाव ‘जीएसटीसह’ ७५ हजार १९० रुपयांवर गेला. तर चांदीनेही ८६ हजार ५२० प्रतिकिलोचा टप्पा गाठला आहे.

महिन्याभरात आता सात हजारांची वाढ सोन्यात झाली आहे. सोन्यातील दरवाढीचा परिणाम मंगळवारी (ता. ९) ग्राहकांच्या खरेदीवर दिसून आला. गुढीपाडव्याचा मुहूर्त असतानाही सोने खरेदीत निम्म घट झाली होती. यामुळे सुवर्ण बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे.

सोन्याचे काही दिवसांतील दर (विना जीएसटी)
तारीख–सोने (प्रतितोळा)–चांदी (प्रतिकिलो)
५ मार्च– ६४ हजार ३००– ७३ हजार
२३ मार्च–६६ हजार २००–७५ हजार
२८ मार्च–६६ हजार ३००–७५ हजार
२९ मार्च–६८ हजार २००–७६ हजार
२ एप्रिल–२०२४–६८ हजार ७००–७७ हजार
३ एप्रिल–६९ हजार ४००–७८ हजार
५ एप्रिल–७० हजार ६००–८१ हजार
८ एप्रिल–७१ हजार ८००–८३ हजार
९ एप्रिल–७१ हजार २००–८२ हजार
१२ एप्रिल–७३ हजार–८४ हजार