⁠ 
रविवार, मे 19, 2024

चोरट्यांचा धुमाकूळ ; वैष्णोदेवी माता मंदिरातील दानपेटी फोडून लाखोंचा ऐवज लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून चोरट्यांना खाकीचा धाकच राहिला नसल्याचं दिसून येतेय. अशातच आता चोरट्यांनी मंदिरात ठेवलेल्या दानपेट्या देखील लक्ष केल्या आहेत. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील वैष्णोदेवी माता मंदिरातील दानपेटी फोडून चोरटयांनी दीड लाखांपर्यंतची रक्कम चोरट्यांनी लांबविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील कुऱ्हाडदे रोडवरील वैष्णोदेवी माता मंदिर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराला लावलेले तीन कुलुप तोडून दानपेटीतील एक ते दीड लाखापर्यंत रक्कम घेऊन पसार झाले आहे. दरम्यान आज सकाळी मंदिरातील सुरक्षा रक्षक भावसिंग बारेला हा आरती करण्यासाठी आला असता त्यांना हा प्रकार दिसला.

यानंतर भावसिंग बारेला याने मंदिराच्या संचालक राजु आबटकर, मधुकर आबटकर, भगवान बारी यांना कळविले. मागिल दीड ते दोन वर्षांपासून दानपेटीतील रक्कम काढलेली नव्हती. म्हणून अंदाजे यात एक ते दीड लाखापर्यंत रक्कम असण्याची शक्यता आहे. दरम्यान मंदिरातील चांदीचे वैष्णोदेवी माता मुर्ती वरील छत्र, डिजिटल मोठा स्पिकर व इतर काही वस्तु सुखरुप आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.