⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता ; खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता ; खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२४ । गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खाद्यतेलाने आनंदवार्ता आणली आहे. खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या असून यामुळे गेल्या एक वर्षांपासून खाद्यतेलाच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशातील खाद्यतेल-बियाणे बाजारात सर्व तेलाच्या किंमतीत बदल दिसून आला. मोहरी, शेंगदाणे, सोयाबीन तेल, तेलबिया, कच्चे पाम तेल, पामोलिन तेल, कापसाच्या तेलात तेजीचे सत्र दिसून आले.बाजारातील तज्ज्ञांनुसार, या पुनरावलोकनाधीन आठवड्यापासून मोहरीची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. 16-16.25 लाख पोतीपर्यंत मोहरी बाजारात दाखल झाली आहे. हरियाणा आणि श्रीगंगानगर येथील मोहरीचे पीक थोडे उशीरा येते. एप्रिलच्या अखेरपर्यंत मोहरीची मोठ्या प्रमाणात आवक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना ही आवक 9-9.25 लाख पोत्यांवरच स्थिरावली.

MSP वर सरकारकडून खरेदी

दरम्यान अनेक राज्यांनी किमान आधारभूत किंमतीआधारे (MSP) सरकारने खरेदी सुरु केली आहे. काही तज्ज्ञांनी येत्या काही दिवसांत सूर्यफूल (Sunflower) आणि सोयाबीनची (Soybean) आयात वाढण्याची शक्यता वर्तवित होते. पण त्यांचा अंदाज फसला. मोहरीचा भाव पाडण्यासाठी ही चर्चा घडवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अल्पभूधारक आणि छोटी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनीच माल बाजारात आणला आहे. पण अजून मोठे आणि मध्यम शेतकरी चांगल्या भावाच्या प्रतिक्षेत माल बाजारात आणत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. हे शेतकरी किमान आधारभूत किंमती वाढण्याच्या प्रतिक्षेत आहे. एप्रिलमध्ये मोहरीची आवक 15-16 लाख पोती येण्याची गरज होती, पण आता 9.9.25 लाख पोती बाजारात आली आहे.
सोयाबीनचे दाम घसरले

सूत्रांच्या माहितीनुसार, खाद्यतेलाचा पुरवठा अद्याप वाढलेला नाही. पण घाऊक बाजारात तेलाची मागणी वाढली आहे. सोयाबीनचे दाम घसरल्याने शेतकरी हैराण आहे. सध्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा पण सोयाबीनचा भाव कमी आहे. अनेक बाजारात सध्या सोयाबीन आणि तिळाच्या तेलाचा साठा असल्याचे समोर आले आहे. आयातीत तेलाच्या किंमती पण स्वस्त झाल्याने बाजारात पुन्हा तेलाचे दाम कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.