⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळणार; जिल्ह्यात 5 तारखेपासून पावसाचा अंदाज

उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळणार; जिल्ह्यात 5 तारखेपासून पावसाचा अंदाज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२४ । देशासह राज्यातील हवामानात सतत बदल पाहायला मिळत आहे. कुठे तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाचे तीव्र चटके बसत आहे तर कुठे अवकाळी पावसाचं सावट आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असतानाच, जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात ५ ते ८ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून (आयएमडी) वर्तविण्यात आला आहे. यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढताना दिसून आला. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर गेल्यानं उन्हाचे तीव्र चटके बसत आहे. दरम्यान, काल मंगळवारी जळगावचा पारा ४१ अंशांपर्यंत गेला होता. ३ व ४ एप्रिल रोजीदेखील तापमानात वाढ होणार आहे. मात्र, ५ एप्रिलनंतर पुढील चार दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाची स्थिती कायम राहणार आहे

जळगावसह मध्य महाराष्ट्र व विदर्भ या पट्ट्यात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराकडून आर्द्रतायुक्त वारे वाहत आहेत. त्याच वेळेस गुजरात व राजस्थानकडूनदेखील उष्ण वारे सक्रिय आहेत. या दोन्ही प्रकारच्या वाऱ्यांमुळे जिल्ह्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यातदेखील याच चक्रामुळे पाऊस झाला होता. मात्र, ५ एप्रिल रोजी तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र हे अधिक मजबूत राहणार असल्याने तब्बल चार दिवस जिल्ह्यात पावसाची स्थिती राहणार आहे. केवळ पाऊसच नाही, तर ढगांच्या गडगडागट व विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ८ एप्रिलपर्यंत ही स्थिती राहील, त्यानंतर मात्र पुन्हा उन्हाचा तडाखा वाढणार आहे

दरम्यान, जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. रब्बी हंगामातील पिकांची काढणी जवळपास ९० टक्के झाली आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित गव्हाचीही काढणी पूर्ण होईल. त्यामुळे अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फारसा फटका बसणार नाही. मात्र, वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने केळीला फटका बसू शकतो.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.