⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | शिक्षकांसाठी भुसावळमार्गे दादर-गोरखपूर शिक्षक विशेष एक्स्प्रेस धावणार

शिक्षकांसाठी भुसावळमार्गे दादर-गोरखपूर शिक्षक विशेष एक्स्प्रेस धावणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२४ । मध्य रेल्वे उन्हाळ्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन दादर ते गोरखपुर दरम्यान शिक्षकांसाठी दोन पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. ०५१०९ शिक्षक विशेष दादर येथून २ मे रोजी दुपारी २.०५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २.४५ वाजता गोरखपूरला पोहोचेल.

०५१०२ शिक्षक विशेष गोरखपूर येथून १० जूनला दुपारी २.२५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता दादरला येईल, ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, रानी कमलापती स्टेशन, बीना, ललितपुर, टिकमगव, खडगपूर, महाराजा छत्रसाल स्टेशन छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूट धाम कवी, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, ज्ञानपूर रोड, वाराणसी, ओरिहार, मऊ, भटनी, देवरिया येथे थांबणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.