जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२४ । रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या सुटीचा हंगाम सुरू होणार असून, परीक्षांनंतर कुटुंबारसह फिरायला जाणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. यात पर्यटन स्थळांपेक्षा धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या रेल्वेचे आरक्षण जलदगतीने फुल्ल होत आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एप्रिलपासून पाच उन्हाळी विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या भुसावळमार्गे धावणार असून, जळगावसह भुसावळच्या प्रवाशांची सोय होईल. या रेल्वे मुंबईतून सुटणार आहेत. रेल्वे क्रमांक ०१०५३ लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस साप्ताहिक विशेष रेल्वे ३ एप्रिल ते २६ जूनपर्यंत प्रत्येक बुधवारी मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४.०५ वाजता बनारस पोहचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, ज्योनाथपूर आणि वाराणसी असे थांब असतील असे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून कळवण्यात आले आहे