⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | ते नवरीवाले, आता आम्हाला नवरदेव वाला समजून.. ; काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील

ते नवरीवाले, आता आम्हाला नवरदेव वाला समजून.. ; काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप विरुद्ध शिंदे गटात नाराजीचे चित्र पाहायला मिळत असून यावरून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या लोकसभेत भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केल्यानंतर विधानसभेत आमच्यासमोर भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले होते. मात्र गेल्या काळातील केलेल्या चुकांची पुढच्या काळात भाजपकडून पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा मंत्री गुलाबराव पाटीलांनी व्यक्त केली आहे. ते जळगावात माध्यमांशी बोलत होते.

1990 सालापासून आम्ही भाजपचा खासदार आम्ही निवडून दिला आहे. यावेळी सुद्धा आम्ही कुठल्या गोष्टीची कमतरता करणार नाही. आम्ही नवरदेव वाले आहोत ते नवरीवाले आहे. त्यामुळे पुढच्या काळात त्यांनी आम्हाला नवरदेव वाला समजून मदत करावी हीच अपेक्षा आहे. असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

आम्ही जर मन लावून काम करतो आहे. तर तुम्ही सुद्धा आम्हाला त्यावेळी मदत केली पाहिजे. ही अपेक्षा ठेवणे काही चुकीचे नाही. मागच्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत. त्या पुढच्या काळात घडणार नाही. अशा आश्वासन आम्हाला राज्यस्तरावर झालेल्या बैठकीत दिलेलं आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.