एकाच दिवसात सोने १२०० रुपयाने ते चांदी १००० रुपयांनी महागली
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२४ । जागतिक बाजारातील घडामोडीमुळे गुरुवारी सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या दरात दिवसभरात १२०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आता नवा विक्रमी टप्पा गाठत प्रती तोळ्याचे दर ६७,३०० रुपयांवर (जीएसटीसह ६९,३१९ रुपये) वर पोहोचले आहे.
शिवाय चांदीच्या दरातही १ हजारांची वाढ होवून चांदी ७६००० रु. किलो झाली आहे. अमेरिकन फेडरल बँकेच्या दोन दिवसीय बैठकीच्या भाषणात आगामी जून-जुलैत व्याजदरात कपात करण्याबाबतच्या संकेतामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांनी खरेदी वाढवल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. बुधवारी अवघ्या १०० रुपयांची वाढ होत सोन्याने ६६, १०० हा नवा उच्चांकी दर गाठला होता. तो मोडीत काढत गुरुवारी तब्बल १२०० रुपयांची वाढ नोंदवत सोने ६७, ३०० वर पोहचले आहे
लवकरच ७० हजारांचा आकडा गाठणार असल्याचे मार्केट विश्लेषकांचे म्हणणे आहे.