जळगाव लाईव्ह न्यूज । 17 मार्च 2024 । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगाव विमानतळावरून उड्डाण ५.० योजनेंतर्गत ‘फ्लॉय ११’ विमान कंपनीला उड्डाण परवाना देण्यात आला असून गोव्यासह पुणे आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. ८ एप्रिलपासून गोवा, हैदराबादला, तर १ मेपासून पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
मागील गेल्या तीन वर्षांपासून जळगावची विमानसेवा बंद पडली आहे. विमानसेवा अचानक बंद झाल्यानंतर, जळगाव विमानतळावरून कुठल्याही विमान कंपनीतर्फे विमानसेवा सुरू करण्यात आलेली नव्हती. गेल्या वर्षी उडान योजनेच्या तिसऱ्या राउंडमध्ये नवीनच स्थापन झालेल्या ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने जळगावहून एकाच वेळी पुणे, गोवा व हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली. यासाठी ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने प्रस्ताव पाठविला होता.
त्यानुसार भारतीय विमानतळ प्राधीकरण अर्थात डीजीसीएने उड्डाण ‘फ्लॉय ११’ विमान कंपनीला जळगाव विमानतळावरून उड्डाण परवाना दिला. यामुळे ‘फ्लॉय ९१’ कंपनीला गोवा, हैदराबाद तसेच पुणे विमानतळावरून मिळालेल्या स्लॉटनुसार विमानसेवा वेळापत्रक तयार केले आहे. या वेळापत्रकानुसार जळगाव विमानतळ विभागाकडून उड्डाण परवाना दिला आहे. तर या विमानसेवेचे वेळापत्रक अंतिम मंजुरीसाठी डीजीसीएकडे पाठविले असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरण विभागाने दिली.
असे राहणार विमानसेवेचे वेळापत्रक
८ ते ३० एप्रिलदरम्यान गोव्यावरून सकाळी ८:५५ वाजता जळगाव विमानतळावर विमानाचे आगमन होईल. तसेच हैदराबादला सकाळी ९:२५ वाजता जाईल. हैदराबादवरून दुपारी १:२५ मिनिटांनी जळगाव विमानतळावर आगमन होईल. तर गोव्याला १:५५ वाजता उड्डाण करेल. १ मे ते २६ ऑक्टोबरदरम्यान गोव्यावरून दुपारी ४:५ वाजता जळगावला विमान येईल. तर दुपारी ४:३५ वाजता हैदराबादला रवाना होईल. हैदराबादवरून रात्री ८:३५ वाजता विमान जळगावला येईल, तर रात्री ९:५ वाजता गोव्याला रवाना होईल.
तसेच १ मेपासून पुण्यावरून सायंकाळी ६:३० वाजता जळगावला विमान येईल, तर सायंकाळी ७:२० वाजता पुण्याला विमान रवाना होईल
वेबसाईट, विमानतळावरून करा तिकीट बुकिंग
जळगाव विमानतळावरून गोवा, हैदराबाद तसेच पुणे येथे सेवा सुरू होणार आहे. त्यानुसार प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी ‘फ्लॉय ९१’ विमान कंपनीच्या अधिकृत वेबासाइटवरून तसेच जळगाव विमानतळावरदेखील तिकीट बुकिंगची सुविधा केली जाणार आहे