जळगाव लाईव्ह न्यूज | 15 मार्च 2024 | भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. होळी, धूलिवंदनाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध मार्गावर विशेष गाड्या चालविल्या जात आहे. याच दरम्यान, आता रेल्वे प्रशासनाने पुणे – संबलपूर या मार्गावर विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी भुसावळ मार्गे पुण्याला धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
०८३२७ संबळपूर- पुणे विशेष गाडी १७ ते ३१ मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी संबळपूर येथून रात्री १० वाजता सुटेल. ती तिसऱ्या दिवशी पुणे येथे पहाटे २.४५ वाजता पोहोचेल. ही गाड्या भुसावळ स्थानकावर सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटाने पोहोचेल. तर परतीच्या वेळी ०८३२८ पुणे संबळपूर ही विशेष गाडी १९ मार्च ते २ एप्रिल या काळात प्रत्येक मंगळवारी पुणे येथून सकाळी ९.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी संबळपूर येथे दुपारी १.३० वाजता पोहोचेल.परतीच्या वेळी ही गाडी भुसावळ स्थानकावर सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटाने पोहोचेल
या स्थानकांवर असणार थांबे
या गाडीला बारगढ रोड, बालनगीर, टिटलागढ़, कांताबाजी, खारियार रोड, महासुमुंड, लाखोली, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, नगर येथे थांबा दिला आहे.