⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | महाराष्ट्र | डॉ. केतकी पाटीलांनी घेतले आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधीचे दर्शन

डॉ. केतकी पाटीलांनी घेतले आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधीचे दर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२४ । चंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन | ते सर्वांही सदा सज्जन | सोयरे होतु || आपल्या सरळ,साध्या प्राकृतिक भाषेत ज्ञानेश्वरी आणि पसायदान द्वारे भक्तीचा आणि मोक्षाचा मार्ग दाखवणारे,संत ज्ञानेश्वर माऊली हे आजही महाराष्ट्राच्या कणाकणात विसावलेले आहेत. दरम्यान, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका तथा भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी आळंदी येथे जाऊन संत ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी मंदिरातील गाभाऱ्यात किर्तन आणि सत्संगाचे भाग घेतला. यावेळी मंदिर गाभाऱ्यातील कीर्तनकार ह भ प गोपाल महाराज विवरेकर यांच्या कीर्तनात आणि टाळ मृदंगाच्या सानिध्यात मंत्रमुग्ध झाले. वारकरी संप्रदायातून समाजास मार्गदर्शन करणाऱ्या ह भ प संतोष महाराज लाजणे, ह भ प दिलीप महाराज ठाकरे, ह भ प ज्ञानेश्वर महाराज जाधव, ह भ प लक्ष्मण महाराज पाटील, ह भ प चंदिले नाना, ह भ प गोपाल महाराज विवरेकर,ह भ प अमोल महाराज रावेरकर, ह भ प रविंद्र महाराज वाव्हळ, ह भ प नामदेव महाराज नेतेकर या सर्व विभूतींचा यावेळी टाळ देऊन सत्कार केला.

यावेळी ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर महाराज,विष्णू नारायण बोरोले, राहुल पाटील, कृष्णाजी डहाके पाटील,दैनिक सकाळचे पत्रकार विलास रामचंद्र काटे, दैनिक सामना पत्रकार अर्जुन मंदनकर आधी विभूतींची उपस्थिती होती. हा योग ह भ प धनंजय महाराज धांडे यांच्या सहकार्यातून घडून आला याबद्दल केतकी पाटील यांनी त्यांचे आभार मानले

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.