जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२४ । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाला जवळपास 18 जागा निश्चित निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानुसार जळगावची जागा ही ठाकरे गटाला सुटली असून यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला ओपन चॅलेंज देत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. “ते डिपॉझिट वाचवू शकत नाहीत. बाकी काय बोलायचं”, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
जळगाव लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवाराने किमान डिपॉझिट वाचवून दाखवावं, असं चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे. दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर शिवसेना ठाकरे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे .मात्र लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच जळगाव लोकसभा मतदारसंघात या निमित्ताने वातावरण तापल्याच पाहायला मिळत आहे.दरम्यान, ठाकरे गटाला किती आणि कोणकोणत्या लोकसभेच्या जागा सुटल्या आहेत याबाबतची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’ ने दिली आहे
शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी
कल्याण – सुषमा अंधारे किंवा आदित्य ठाकरे
ठाणे – राजन विचारे
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तीकर
पालघर – भारती कामडी
छ. संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
नाशिक – विजय करंजकर
रायगड – अनंत गीते
रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
मावळ – संजोग वाघेरे
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
वाशिम-यवतमाळ- संजय देशमुख
परभणी – संजय जाधव
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
जळगाव – हर्षल माने
हिंगोली – नागेश आष्टिकर