पीएसआयला एक वर्षाच्या शिक्षेसह पाच लाखांचा दंड ; नेमकं प्रकरण काय
जळगाव लाईव्ह न्यूज । 2 मार्च 2024 । हातउसनवारी म्हणून दिलेल्या तीन लाख रुपयांची परतफेड म्हणून दिलेला धनादेश अनादर प्रकरणी पोलिस मुख्यालयाच्या एमटी सेक्शनमध्ये कार्यरत पीएसआयला पाच लाखांचा दंड व एक वर्षाच्या शिक्षेचे आदेश न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत. हंसराजसिंह पद्मसिंह हजारी हे निवृत्त पीएसआय आहेत.
त्यांनी २८ जानेवारी २०२१ रोजी पीएसजाय किजग एकनाथ कोळी यांना हातउसनवारी म्हणून तीन लाख रुपये समाधान पाटील व आसिफखान गफ्फारखान यांच्या समक्ष परत करण्याच्या बोलीवर दिले होते. या पैशांची मागणी केल्यावर पीएसआय कोळी यांनी १२ नोव्हेंबर २०२९ या तारखेचा २,७३,००० रुपयांचा एचडीएफसी बँकेचा धनादेश दिला होता. हा धादेश अनादरीत झाल्याने निवृत्त पोलिस उपनिरीक्षक हजारी यांनी आपल्या वकील्लातर्फे नोटीस पाठवली, तरीही रक्कम न मिळाल्याने तिसरे सत्र न्यायालयात फिर्याद दाखल केली.
त्यावर २० ते २५ सुनावण्या घेण्यात आल्या. त्यानंतर शुक्रवारी न्यायाधीश श्रीमती जान्हवी केळकर यांनी आरोपी विजय कोळी याला दोषी धरून एक वर्षाची शिक्षा व पाच लाख रुपये दंड केला. या खटल्यात फिर्यादीतर्फे अॅड. रघुनाथ गिरणारे व अँड. हेमंत गिरणारे यांनी काम पाहिले