जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२४ । झारखंडच्या जामतारा येथून हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. या अपघातात आतापर्यंत 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेक जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनची धडक बसून 12 जणांचा मृत्यू झाला. जामतारा-करमातांडच्या काळझरियाजवळ लोकांना ट्रेनची धडक बसली. वास्तविक, आंग एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. प्रवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उडी मारली. इतक्यात समोरून दुसरी गाडी आली. झाझा-आसनसोल ट्रेन समोरून जात असताना या ट्रेनची लोकांना धडक बसली. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर काही लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहेत.
या घटनेनंतर घटनास्थळी रेल्वे पोलीस, स्थानिक प्रशासन, अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात नेलं जात आहे. स्थानिक नागरीक देखील बचाव कार्यात पोलिसांना मदत करत आहेत.