⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | राशिभविष्य | आजचे राशिभविष्य : २६ मे २०२१

आजचे राशिभविष्य : २६ मे २०२१

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेष

आज उत्तम वैवाहिक सौख्याची प्राप्ती होईल. दाम्पत्य जीवनातील मधुरता,प्रेम वृद्धिंगत होईल. आवडत्या कार्यक्षेत्रात काही नवीन संधी उपलब्ध होतील.

वृषभ

आज काहीसे शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याच्या छोट्यामोठ्या तक्रारी सतावतील. उधार उसनवारी टाळा. हितशत्रूंच्या कारवायांना म्हणून पाडाल.

मिथुन

आज आपल्या कार्यक्षेत्रात काही नवीन संधी निर्माण होतील. कलाक्षेत्रातील मंडळींसाठी उत्तम दिवस राहील. काही प्रिय व्यक्तींच्या सहवासाने सुखावून जाल.

कर्क

आज उत्तम गृह सौख्याची, समाधानाची प्राप्ती कराल. कुटुंब, परिवारात सुवार्ता येतील. परिवार, कुटुंबाप्रती आपले कर्तव्य बजावाल.

ज्येष्ठांचे आशीर्वाद प्राप्त कराल.

सिंह

आज काही नवे नियोजन उत्साहात करून त्याप्रमाणे कार्यास प्रारंभ कराल. नवनवीन संकल्पना तसेच नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यावसायिक बदल घडवून आणाल.

कन्या

आज कौटुंबिक वातावरण समाधानी,आनंदी व उत्साहवर्धक राहील. कुटुंबीयांसमवेत काही धार्मिक कार्यात मग्न राहाल. काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहारही पार पाडाल.

तुळ

आजचा दिवस आपणासाठी नवचैतन्याचा व उत्साहवर्धक असेल. आपल्या कलाकृतीचे कौतुक होईल. आज स्वतःसाठी देखील वेळ काढाल.

वृश्चिक

आजचा दिवस काहीसा चिंता, भीती यांनी युक्त जाऊ शकतो. विनाकारण मनावर दडपण येईल. परंतु व्यर्थ चिंता न करता केवळ नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करा.

धनु

आज उत्तम लाभप्राप्ती, इच्छाप्राप्ती संभवते. आज बऱ्याच गोष्टी आपल्या मनाजोगत्या घडतील. जुन्या मित्र-मैत्रिणींशी वार्तालाप संभवतो.

मकर

आज कामाच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. जास्तीचे काम करावे लागल्यामुळे काहीशी दगदग संभवते. मात्र चांगल्या कामाची शाबासकी देखील मिळेल.

कुंभ

आजच्या दिवशी काही धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यात सक्रिय राहाल. त्यामुळे कौतुकास, प्रशंसेस पात्र ठराल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मीन

आजचा दिवस काहीसा प्रतिकूल असेल. त्यामुळे वाद-विवादांपासून अलिप्त राहा. कोणत्याही परिस्थितीत आपले मनोधैर्य खचणार नाही याची काळजी घ्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.