जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२४ । जिल्ह्यात बैलगाडी शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र परवानगी न घेता मेहरुण गावात १६ रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी सोमवारी चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यासाठी १५ दिवस अगोदर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र तसे न करता मेहरुण गाव शिवारात १६ फेब्रुवारी रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. हा प्रकार लक्षात आल्याने जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे अधिकारी गणेश भांडारकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यावरून आयोजक वैभव युवराज सानप, विवेक वासुदेव सानप, प्रणव हरिचंद्र गवळी, संकेत सोपान महाजन यांच्याविरुद्ध दि. १९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.