जळगाव लाईव्ह न्यूज । 7 फेब्रुवारी 2024 । तळीरामांसाठी आनंदाची बातमी आहे. जैसलमेर इंडियन क्राफ्ट जिन सारख्या लग्झरी दारुच्या ब्रँडच्या यशानंतर इंडियन स्पिरिट मेकर रेडिओ खेतानने स्पिरिट व्हिक्ट्री 1999 प्युअर माल्ट व्हिस्की लॉन्च केली आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणात सुरुवातीला या व्हिस्कीचं वितरण होणार आहे. त्यानंतर इतर राज्यांमध्येही या व्हिस्कीचं वितरण केलं जाणार आहे.
दरम्यान, ही व्हिस्की 999मधील कारगिर युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून तयार करण्यात आली आहे. 1965 द स्पिरीट ऑफ व्हिक्ट्री प्रीमियम XXX रम आणि 1965 स्पिरिट ऑफ व्हिक्ट्री लॅमन डॅशच्या यशाची परंपरेला कायम ठेवण्याचं काम नवी व्हिस्की करत आहे. या कॅटेगिरीतील प्रत्येक प्रोडक्ट गुणवत्ता लक्षात घेऊनच तयार करण्यात आलं आहे. या लॉन्चिंगनंतर कंपनी प्युअर माल्ट व्हिस्कीचा लाभही उठवत आहे.
इतकी आहे किंमत?
या स्पिरिट ऑफ व्हिक्ट्रीची सुरुवातीची किंमत 5 हजार रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
या व्हिस्की, रमही लॉन्च
कंपनी आफ्टर डार्क व्हिस्की (After Dark Whisky), कोन्टेसा रम (Contessa Rum), मॅजिक मोमेंट्स वोडका (Magic Moments Vodka) आदी ब्रँड विकत आहे. कंपनीने या वर्षी ऑक्टोबरमध्ये रॉयल रणथंभोर हेरिटेज कलेक्शन- रॉयल क्राफ्टेड व्हिस्की (Royal Ranthambore Heritage Collection-Royal Crafted Whisky) लॉन्च केली आहे.