⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | शेतकऱ्यांची चिंता वाढली…सोयाबीनचा भाव घसरला, आता प्रतिक्विंटला किती मिळतोय भाव?

शेतकऱ्यांची चिंता वाढली…सोयाबीनचा भाव घसरला, आता प्रतिक्विंटला किती मिळतोय भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 6 फेब्रुवारी 2024 । एकीकडे कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच सोयाबीनचा भाव घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोयाबीनच्या दरात १ हजार ते १२०० रुपयांची घसरण झाली असून सध्या स्थितीला सोयाबीनला ४१००- ४२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतोय.

जळगाव जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीन चांगल्या स्थितीत होते; मात्र, इतर जिल्ह्यांमध्ये सोयाबीनला पावसाअभावी तर काही ठिकाणी अतिपावसामुळे फटका बसला आहे.सुरुवातीला सोयाबीनला ४५०० ते ५००० रुपयापर्यंतचा भाव मिळाला. यापूर्वी २०२१ मध्ये सोयाबीनला विक्रमी ९ ते ११ हजारांचे दर मिळाले होते.

काही शेतकऱ्यांनी भाव आणखी वाढेल ह्या आशेवर सोयाबीन साठवून ठेवली होती. मात्र भाव वाढण्याऐवजी घसरल्याचे दिसून आले. सोयाबीनच्या दरात १ हजार ते १२०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या सोयाबीनला ४१०० ते ४३०० रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.