जळगाव लाईव्ह न्यूज | 30 जानेवारी 2024 | महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत.शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापनेनंतर वर्षभरानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाला. यामुळे सत्ताधारी मंत्र्यांकडे असलेली खाती ही इतर नेत्यांना देण्यात आली. मात्र, याच निर्णयावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. महाजनांनी त्यांची ही नाराजी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केली आहे. “आमच्याकडे मित्र वाढले, पार्टनर वाढले की मग खाते बदलतात. त्यांच्या डिमांडप्रमाणे खातं बदलतात, अशीही नाराजी महाजनांनी व्यक्त केली.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
नागपुरात खासदार औद्योगिक महोत्सव समापन कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी ही नाराजी व्यक्त केली. खाते बदल आणि पर्यटनात महाराष्ट्र पिछाडीवर आल्यावरूनही महाजन यांनी नाराजी व्यक्त केलीय. दरम्यान त्यांच्या नाराजीनंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लगेच प्रतिक्रिया देत त्यांना आश्वस्त केलं. “पर्यटनाला इंडस्ट्री म्हणून बघितलं पाहिजे. पूर्वी राज्यांमध्ये आपण दोन नंबरवर होतो. आता नऊव्या, दहाव्या नंबरवर आहोत. याचा विचार करण्याची गरज असल्याचं गिरिश महाजन म्हणाले.
माझ्याकडे तीन सेक्रेटरी बदललेलेत. त्यामुळे कसं काम करावं हे मला कळत नाही. तीन वर्षात तिसऱ्यांदा मंत्री झाले आहे. अडचणी भरपूर आहेत. अजून ७-८ महिने हे खातं माझाकडे ठेवलं तर मला काहीतरी करता येईल, असं मला वाटतं”,असं म्हणत गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. गिरीश महाजन एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे आणखी मोठं वक्तव्य केलं. “आमच्याकडे मित्र वाढले, पार्टनर वाढले की मग खाते बदलतात. त्यांच्या डिमांडप्रमाणे खातं बदलतात, अशीही नाराजी महाजनांनी व्यक्त केली.
त्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी त्यांची नाराजी दूर केली. गिरीश भाऊ तुम्ही चिंता करू नका पुढच्या काळात तुमच्या खानदेशमध्ये सुद्धा हा कार्यक्रम नितीनजी करतील. तुम्ही जे सांगितलं ते लक्षात घेत आता तुम्हीच परमनंट पर्यटनमंत्री आहेत. त्यामुळे तुम्हाला उत्तर महाराष्ट्रात विदर्भात जिथे वाटते तिथे पर्यटन वाढवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ नितीनजींनी तुम्हाला पर्यटनाच्या संदर्भातला संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, असं फडणवीस म्हणाले.