गुडन्यूज ! भुसावळ, जळगावमार्गे पुण्याला जाण्यासाठी नवीन ट्रेन सुरु, रिझर्व्हेशन करण्याची गरज नाही
जळगाव लाईव्ह न्यूज | 28 जानेवारी 2024 | जळगाव जिल्ह्यातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र सध्या महाराष्ट्र एक्सप्रेसनंतर सोयीस्कर ट्रेन नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. मात्र अशातच आता अमरावती सातारा दरम्यान 01155/56 ही विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजेच रिझर्व्हेशन करण्याची गरज नाही नाहीय. ही गाडी अनारक्षित आहे.
या गाडीमुळे एकमेव महाराष्ट्र एक्सप्रेस नंतर पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दुसरी गाडीमुळे दिलासा मिळाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी अमरावती- सातारा अनारक्षित ही विशेष गाडी क्रमांक 01155 सुरू झाली आहे. अमरावतीहुन ही गाडी दुपारी १.३० वाजेल सुटेल. त्यानंतर भुसावळ ही गाडी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटाने पोहोचेल. जळगावला ५ वाजून ३७ मिनिटाने पोहोचेल.तर पहाटे पुण्याला ती ३ वाजून ४० मिनिटाने पोहोचेल. सातारा येथून ही विशेष गाडी क्रमांक 01156 ही 28 जानेवारीस सातारा येथून साडेचारला सुटेल. तर अमरावती येथे दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल.
या स्थानकांवर थांबेल
अमरावतीहुन सुटल्यानंतर बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड,कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौड कॉर्ड लाइन, पुणे, जेजुरी, लोणंद आणि सातारा या स्थानकावर थांबेल. या गाडीत सर्व १४ डबे सामान्य द्वितीय श्रेणीचे असतील. यामुळे प्रवाश्यांनी या गाडीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे रेल्वे प्रशासनाने केले आहे.