जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२४ । दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे अधिकचा वेळ मिळणार आहे. सोबतच परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटांपूर्वी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येणार आहे.
फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये निर्धारीत वेळापूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याची सुविधा रद्द करण्यात आली होती. मात्र, आता पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून हा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीमध्ये होणार आहे. तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा एक मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. फेब्रुवारी – मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना आता दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे.
फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांची वेळी सकाळ सत्रात सकाळी 11 वाजता वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळ सत्रात सकाळी 10.30 वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी 2.30 वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रामधील 11 ते 2.10, 11 ते 1.10, 11 ते 1.40 अशी वेळ असणार आहे. तर दुपारच्या सत्रातील 3 ते 6.10, 3 ते 5.10, 3 ते 5.40 अशा प्रकारे सर्व पेपरसाठी वेळ 10 मिनिटे वाढवून देण्यात आली आहे.