⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | शेतकऱ्यांची चिंता वाढली! कापसाचे दर हमीभावापेक्षाही आले खाली, आताचा भाव पहा..

शेतकऱ्यांची चिंता वाढली! कापसाचे दर हमीभावापेक्षाही आले खाली, आताचा भाव पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 16 जानेवारी 2024 । गेल्या वर्षापासून कापूस उत्पादकांवर आलेली संक्रांत यंदाही कायम असून, कापसाचे दर आता हमीभावापेक्षाही ४०० रुपयांनी खाली आले आहेत. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. सध्या कापसाचे दर ६५०० ते ६७०० रुपयांवर आला आहे. भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला नव्हता मात्र भाव वाढण्याऐवजी कापसाचे भाव दिवसेंदिवस घसरत जात आहेत.

२०२१-२२ या हंगामात कापसाचे दर १० हजारांच्या पुढे गेले होते. मात्र, गेल्या वर्षाच्या हंगामानंतर कापसाचे दर कमीच होत आहेत. यंदा ऑक्टोबर महिन्यात कापसाचे दर ८ हजार ते ८५०० रुपयांपर्यंत होते मात्र जसजसा हंगाम पुढे सरकत आहे. त्याचप्रमाणे कापसाचे दर हे न वाढता कमी होत जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

शासनाकडून कापसाला ७ हजार २० रुपये एवढा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. मात्र तेवढा भाव देखील शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. खासगी जिनिंगमध्ये शेतकऱ्यांच्या चांगल्याच मालालाच ६६०० रुपये इतका भाव दिला जात आहे. गुणवत्ता कमी असलेल्या मालाला तर ५४०० ते ५८०० रुपये इतका दर दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भाववाढीचे कोणतेही संकेत दिसून येत नसून त्यामुळे भाव कमीच होत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.