⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | पर्यटन | अवघ्या 10000 रुपयाच्या बजेटमध्ये फिरा भारतातील ‘ही’ सुंदर नयनरम्य पर्यटनस्थळे

अवघ्या 10000 रुपयाच्या बजेटमध्ये फिरा भारतातील ‘ही’ सुंदर नयनरम्य पर्यटनस्थळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२४ । लग्नानंतर हनिमून ट्रिपला जाण्याची क्रेझ तरुणांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. हनिमून परदेशात जाण्याची क्रेझ खूप वाढली आहे. पण परदेशवारी करणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसते. पण जर तुम्हाला स्वस्तात मस्त ट्रिप प्लान करु शकता. कमी खर्चात हनिमून डेस्टिनेशन शोधत असाल तर भारतातील ही ठिकाणे बेस्ट ठरतील.

माउंट अबू
१० हजार रुपयांत तुम्ही माउंट अबूला भेट देऊ शकता. या ठिकाणी सर्वात खास गोष्ट म्हणजे प्रवासाचा खर्च आणि राहाण्याचा खर्च हा जास्त नसतो. येते तुम्हाला १००० ते १५०० रुपयांपर्यंत हॉटेल्स सहज मिळतील. याशिवाय प्रवासासाठी तुम्हाला एक दिवसासाठी ५०० रुपये भाड्याने स्कूटर मिळते. तसेच ज्या ठिकाणाहून प्रवास कराल तिथे तुम्हाला फक्त ट्रेननेच यावे लागेल. स्लीपर कोचमध्ये तुम्हाला ५०० रुपयांपर्यत तिकीट मिळेल. दोन लोकांचा प्रवास खर्च हा फक्त २००० रुपये होईल. हॉटेलमध्ये २ दिवस राहाण्याचा खर्च २५०० रुपये असेल.

जयपूर
१० हजार रुपयांत तुम्हाला फिरायचे असेल तर तुम्ही जोडीदारासोबत जयपूरला जाऊ शकता. येथे जाण्यासाठी तुम्हाला अनेक वाहने सहज मिळतील. ज्याचे तिकीट ३०० ते ४०० रुपये असेल. स्कूटरीवरुन तुम्हाला संपूर्ण जयपूर शहर फिरता येईल.

किशनगड
बजेट कमी असेल आणि तुम्हाला बर्फाच्छादित प्रदेशात फिरायचे (Travel) असेल तर तुम्ही राजस्थानमधील किशनगडला जाण्याचा प्लान करु शकता. या ठिकाणी तुम्ही एकाच वेळी दोन ठिकाणांना भेट देऊ शकता. पुष्कर हे किशनगडपासून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे. येथे तुम्हाला पांढऱ्या संगमरवरी बनवलेल्या डंपिंग यार्डला भेट देता येऊ शकते. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. येथे १००० रुपयांमध्ये हॉटेल सहज मिळू शकतात. तर ५०० ते ६०० रुपयाने भाड्याने स्कूटरही मिळेल

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.