सोने दरात 2300 रुपयांनी तर चांदीने 5800 रुपयांची झेप घेतली : सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजाराकडे फिरवली पाठ..
जळगाव लाईव्ह न्यूज : 28 डिसेंबर 2023 : ऐन लग्नसराईत सोने आणि चांदीच्या किमतीने मोठा डोंगराएवढा टप्पा गाठला आहे. दोन्ही धातुंच्या किंमती आता यापूर्वीच्या विक्रमाला घवसणी घालण्याच्या तयारीत आहेत. सोने 65,000 रुपयांचा तर चांदीने 78,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. भाव वधारल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे.
गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. दोन आठवड्यांचा विचार करता सोन्याने 2300 रुपयांची झेप घेतली. गेल्या आठवड्यात 880 रुपयांनी तर त्यापूर्वी 1100 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. या आठवड्याच्या सुरुवातीला किंमती स्थिर होत्या. 26 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी तर 27 डिसेंबर रोजी 100 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गेल्या दोन आठवड्याचा विचार करता चांदीत 5800 रुपयांची दरवाढ झाली. तर या आठवड्यात किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली आणि 300 रुपयांची घसरण झाली. या आठवड्यात 25 डिसेंबर रोजी चांदीत 200 तर 26 डिसेंबर रोजी 300 रुपयांची दरवाढ झाली. तर 27 डिसेंबर रोजी 300 रुपयांची घसरण झाली. चांदीत या 15 दिवसांत एकूण 6300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,200 रुपये आहे