⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | गुन्हे | तीन हजारांची लाच घेतांना महावितरणचा वरीष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात

तीन हजारांची लाच घेतांना महावितरणचा वरीष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२३ । जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने तीन हजारांची लाच स्वीकारताना धानोरा (ता.चोपडा) येथील महावितरणच्या वरीष्ठ तंत्रज्ञ यास रंगेहात अटक केली. अनिल शंकर राठोड (28, लक्ष्मी नगर, धानोरा) असं अटक केलेल्या लाचखोराचे नाव असून या कारवाईने वीज कंपनीतील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

50 वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नीचे नावाने देवगाव, ता.चोपडा शिवारात गट नंबर 330 मध्ये शेत आहे. या शेतात थ्री फेजचे ट्युबवेल मोटारसाठी यातील तक्रारदार यांनी वीज कनेक्शन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. तक्रारदार अनिल राठोड यांना भेटल्यानंतर 22 रोजी त्यांनी चार हजारांची लाच मागितली व तीन हजारात तडजोड करण्यात आली. शुक्रवारी दुपारी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. अडावद पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे तसेच एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, किशोर 9महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाणे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.