ग्राहकांचे पुन्हा टेन्शन वाढले ; सोन्याच्या दराने गाठला 62 हजाराचा टप्पा, पहा नवे दर
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२३ । सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळत असून लग्नसराईच्या काळात सोन्याचा भाव पुन्हा वाढल्याने ग्राहकांना पुन्हा टेन्शन आले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Rates) वर आज पुन्हा एकदा सोन्यासह चांदीचे दर वाढले आहेत.
MCX वर सोन्या-चांदीची किंमत
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 126 रुपायांनी वाढून 61,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. याशिवाय चांदीचा भाव 206 रुपयांनी वाढून 73,032 रुपये प्रति किलोने व्यवहार करत आहे.
जळगाव सराफा बाजारात सोन्याचा भाव 62,200 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर चांदीचा भाव 74,500 रुपये किलोवर आहे. सोन्याच्या दरात सतत पतझड पाहायला मिळते. अशातच सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. लग्नसराईच्या काळात दागिन्यांचे भाव वाढल्याने ग्राहकांना झटका बसला आहे.