दिवाळीनिमित्त मामाकडे गेले, परताना तरूण शिक्षकासोबत नको ते घडलं..
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२३ । मामाकडे जावून परतीच्या प्रवासात असतांना २२ वर्षीय तरूण शिक्षकाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने दुदैवी मृत्यू झाला. विजय शाम सोनी (वय-२२, रा. बऱ्हाणपुर मध्यप्रदेश ह.मु. जळगाव) असे मयत झालेल्या शिक्षकाचे नाव असून याबाबत जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुळ रहिवाशी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथील रहिवाशी असलेले विजय शाम सोनी हे जळगावातील स्तमजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. दरम्यान दिवाळी निमित्त ते कल्याण येथील मामांकडे भेटण्यासाठी गेले होते. कल्याणहून परत ते मुळगावी बऱ्हाणपुर येथे जाण्यासाठी बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी रेल्वेने प्रवास करीत आहे. जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वेतून प्रवास करत असतांना रेल्वे खंबा क्रमांक ४०७जवळ धावत्या रेल्वेतून विजय सोनी हे पडले. त्यात सचिन सोनी हे गंभीर जखमी झाले.
ही घटना घडल्यानंतर जळगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार यांनी घटनास्थळी धाव घेवून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. याबाबत जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार करीत आहे.