भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 25 टक्के अग्रिम रक्कम
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२३ । प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या सर्व समावेशक पिक विमा योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांनी १/- रुपया भरून आपल्या खरीप हंगामातील कापूस,उडीद, मूग,सोयाबीन,मका,ज्वारी, बाजरी इ. पिकांचा विमा काढला होता. त्या अनुषंगाने पाचोरा व भडगाव तालुक्यात सरासरी प्रजन्यमान फार कमी झाले होते.
यंदाच्या जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये पाचोरा व भडगाव तालुक्यात 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने दोन्ही तालुक्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिक विम्याच्या 25% अग्रीम रक्कम नुकसान भरपाई पोटी मिळावी अशी मागणी भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक व प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
त्यांच्या या मागणीला व पाठपुराव्याला यश आले असून भडगाव तालुक्यातील 3 महसूल मंडळामधील 18,714 शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम रक्कम नुकसान भरपाई पोटी 8 कोटी 8 लाख 88 हजार 343 रुपये मंजुर झाले असुन शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
या निमित्ताने शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होईल. तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील इतर उर्वरित शेतकऱ्यांसाठी देखील आपला पाठपुरावा सुरू असून त्यासाठी देखील प्रयत्नशील आहे.असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.व ऐन दिवाळीच्या तोंडावर मिळणाऱ्या या मदतीमुळे भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.