गुन्हेजळगाव जिल्हा

पाच वर्षांपासून पोलिसांना चकमा देणारा ठाण्याचा डॉन जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२३ । ठाणे, पालघर येथे दरोडे टाकून पाच वर्षांपासून पोलिसांना चकमा देणाऱ्या दरोडेखोराला जळगाव येथे आयोजित वर्सी महोत्सवातून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके (२४, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) असं या दरोडेखोराचे नाव असून ही कारवाई शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता करण्यात आली.

प्रथमेश ठमके हा ठाणे व पालघर परिसरात मोठमोठे दरोडे टाकून फरार व्हायचा. त्याच्यावर दरोड्यासह इतर वेगवेगळे १६ गुन्हे दाखल आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ठाणे, पालघर पोलिसांसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस त्याचा शोध घेत होते. प्रथमेशचे काही नातेवाईक जळगावात राहतात. त्यामुळे तो जळगावात आला असून सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवात असल्याची माहिती जळगावील एमआयडीसी पोलिसांना मिळाली.

त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्यासूचनेनुसार पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रुपाली महाजन, जिल्हा विशेष शाखेचे सहायक फौजदार दिनेश बडगुजर, पोकॉ अमित मराठे, पोलिस नाईक जुबेर तडवी हे वर्सी महोत्सवात पोहचले. त्या ठिकाणी पोलिसांना पाहून प्रथमेशने पळ काढला. त्या वेळी वरील पथकाने त्याचा अडीच कि.मी. पळत जाऊन पाठलाग केला व त्याला जिल्हा पेठ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याला ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पोळ यांच्या ताब्यात दिले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button