टीव्ही अभिनेत्री आश्का गोराडियाने दिला गोंडस मुलाला जन्म
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२३ । नागिन फेम अभिनेत्री आशका गोराडिया (Aashka Goradia) ही आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्री आशका गोराडियाचा पती ब्रेंट ग्लोबल याने इन्स्टाग्रामवर सर्वांना ही आनंदाची बातमी दिली आहे. यासोबतच त्यांनी सोशल मिडियावर बाळाचा पहिला फोटो आणि नावही जाहिर केलं आहे.
फोटोत आशका आणि तिच्या पतीच्या हातावर मुलाचा हात दिसतोय. हा फोटो शेअर करताना ब्रेंटने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज सकाळी 7:45 वाजता विल्यम अलेक्झांडर या जगात आला. मी या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. आजपसून मी या जगातून जाईपर्यंत अॅलेक्सचा बाबा असेन.
देवाच्या कृपेने आशकाने त्याला जन्म दिला आहे. ती आता विश्रांती घेत आहे, तिच्या शेजारी आमचे लहान बाळ आहे. आमचे अंतःकरण इतके जड कधीच नव्हते. असे प्रेम मी कधीच पाहिले नाही. आणि आता दररोज, माझ्याकडे देवाच्या अस्तित्वाचा जिवंत पुरावा असेल.’’
आशका गोराडिया आणि ब्रेंट ग्लोब यांनी 1 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले. लग्नाच्या 6 वर्षांनंतर हे कपल आई-वडील झाले आहेत.