⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | सणासुदीच्या तोंडावर झटका! सोयाबीनसह सूर्यफुल तेलाच्या दरात वाढ, कारण जाणून घ्या

सणासुदीच्या तोंडावर झटका! सोयाबीनसह सूर्यफुल तेलाच्या दरात वाढ, कारण जाणून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२३ । ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी आहे. मागील काही दिवसापासून खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आता तेलाच्या किमतीत वाढ झालेली दिसून आली.

विदेशी बाजारपेठेत उत्पादनात घट झाल्याने परीणामी सोयाबीन व सूर्यफुल तेलाच्या दरात प्रती पाऊच (९०० मिली) अनुक्रमे सहा आणि पाच रुपयांची वाढ झाली आहे. स्थानिक पातळीवरही सोयाबीन पिकाला फटका बसला असल्याने आगामी काळात पुन्हा दरवाढीची शक्यता असल्याचे घाऊक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

खाद्यतेलात सोयाबीन पाठोपाठ सूर्यफुल तेलाचेही दरही वाढले आहेत. दिवाळीत फराळ व दिव्यांसाठी तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने मागणीत किमान ४० टक्के वाढ होते. यंदा पावसाने अगोदर ताण व नंतर भरघोस पाऊस झाल्याने उत्पादन चांगले येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, तसे झाले नाही. खाद्यतेलात भुईमूगाचे पीक चांगले आल्याने शेंगदाणा तेलाचे दर बाजारात सध्या स्थिर आहेत. गेल्या वर्षी २०० रुपये पाऊच असलेले तेल यंदाही त्याच दरात उपलब्ध आहे. तिळाचे तीळाचे दर २२० रुपये किलो आहे.

विदेशात सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. सोयाबिन तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात उत्पादनाअभावी वाढल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारात दर वाढण्यावर झाला आहे. शुक्रवारी सोयाबिनचे प्रती पाऊचचे दर ९७ तर सूर्यफूलाचे दर ९८ रुपये झाले. जे गेल्या आठवड्यात ९१ व ९३ रुपये होते

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.