शरद कोळी यांची तोफ उद्या जळगावात धडाडणार, पुन्हा मंत्री होणार लक्ष!
जळगाव लाईव्ह न्यूज | १९ ऑक्टोबर २०२३ | शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेते शरद कोळी हे उद्या सकाळी ११ वाजता जळगाव शहरात येणार आहेत. कोळी समाजातर्फे सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला ते भेट देणार असून त्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते दुसऱ्यांदा जळगावात येणार असून पुन्हा विद्यमान मंत्र्यांना लक्ष करण्याची शक्यता आहे.
कोळी समाजातर्फे जात प्रमाणपत्र आणि विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ६ उपोषणकर्त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत असून उद्या सकाळी ११ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी जळगावात येत आहेत. गेल्या वेळी त्यांनी विद्यमान पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी गुन्हा दाखल होऊन मोठा वाद देखील निर्माण झाला होता.
शरद कोळी उद्या दुपारी १२ वाजता कोळी समाजाच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत. राज्य सरकार आणि जळगाव जिल्ह्यातील विद्यमान तिन्ही मंत्र्यांना ते आपल्या टीकेमध्ये लक्ष करण्याची शक्यता आहे.