बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नवरात्रोत्सवाची धूम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२३ । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १५ ते २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या दिवशी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.सुहास बोरोले व डॉ. सुरेखा बोरोले, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार) यांच्यासह सर्व शाखाप्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वर्ग अधिक संख्येने उपस्थित होते.

डॉ.विजयकुमार पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. याप्रसंगी गणेशराज पाटील या विद्यार्थ्याने नवरात्री उत्सवाचे महत्त्व विशद केले, तसेच देवी देवतांसंबंधीत असलेली माहिती त्याचप्रमाणे त्यांच्याशी संलग्नित असलेले मंत्रोच्चार आणि श्लोक या संबंधित संपूर्ण माहिती दिली. या नवरात्री उत्सवामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी वेगवेगळ्या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दांडिया, गरबा, यांचा समावेश आहे. नऊ दिवस चालणार्‍या या उत्सवांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेस्ट दांडिया कपल, बेस्ट दांडिया, बेस्ट गरबा, बेस्ट ड्रेस या स्पर्धांच्या माध्यमातून विविध पारितोषिके ठेवण्यात आलेली आहे.

नवरात्रीच्या पहिल्याच रात्री गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांची उपस्थिती लाभल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आनंद व उत्साह संचारला होता. त्यासोबतच डॉ. वर्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत गरब्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल डॉ.उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या नवरात्री उत्सवाचे नियोजन प्रा. नकुल गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे विद्यार्थी परिश्रम घेत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button