⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जिल्हा उद्योग केंद्रास साडेपाच लाखांचे संगणक उपलब्ध

जिल्हा उद्योग केंद्रास साडेपाच लाखांचे संगणक उपलब्ध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२३ । जळगाव जिल्हा उद्योग केंद्रास आमदार स्थानिक विकास कार्यक्रमात साडेपाच लाख रूपये किंमतीचे ५ संगणक व ५ प्रिंटरचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते जिल्हा निर्यात प्रचालन कक्षाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, व्यवस्थापक राजेंद्र डोंगरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार सुरेश भोळे म्हणाले, जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक व सुशिक्षीत बेरोजगार यांची कामे सुकर होणेसाठी संगणक देण्यात आले आहेत. यामाध्यमातून अधिकारी व कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करतील. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. औद्योगिक समुहास उद्योग विभागामार्फत मंजुरी मिळणेसाठी आमदार सुरेश भोळे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल औद्योगिक समुहामार्फत जळगांव फुड प्रोसेसिंग क्लस्टरचे प्रवर्तक श्रीमती हर्षा बोरोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.