⁠ 
गुरूवार, जानेवारी 9, 2025
Home | गुन्हे | तीन बहिणींच्या एकुलत्या एक भावाचे उचललं टोकाचे पाऊल ; जळगावातील घटना

तीन बहिणींच्या एकुलत्या एक भावाचे उचललं टोकाचे पाऊल ; जळगावातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२३ । जळगावातील खोटेनगरात भाडेतत्वाच्या घरात राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी दुपारी उघडकीस आली. बाळासाहेब लोटन पवार (३५, रा. खोटेनगर) असं मृत तरुणाचे नाव आहे. सकाळपासून घराबाहेर दिसला नाही म्हणून घरमालक दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्याला पहायले गेले असता हा तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

औद्योगिक वसाहतमधील एका कंपनीत कामाला असलेल्या बाळासाहेब पवार याच्या आई-वडिलांचे चार ते पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर तीन बहिणींचे लग्न झाले आहे. त्यामुळे हा तरुण जळगावातील खोटेनगरात भाडेतत्वाच्या घरात एकटाच राहत होता. रविवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपार झाली तरी तो घराबाहेर आला नाही, त्यामुळे घरमालक त्याला पहायला गेले असता त्यांना हा तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्या वेळी त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने तरुणाला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. या तरुणाने शनिवारी रात्रीच गळफास घेतला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

एकुलता एक भाऊ गेला
बाळासाहेब पवार याला तीन बहिणी असून त्या सुरत, पुणे व धुळे जिल्ह्यातील नंदाडे येथे राहतात. अगोदरच आई-वडिलांचे निधन झालेले व त्यात एकुलत्या एक भावानेही जीवन संपविल्याने बहिणींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.