⁠ 
गुरूवार, जानेवारी 9, 2025
Home | गुन्हे | चोरीच्या घटना थांबेना! जळगावात बंद घर फोडून ४४ हजाराचा ऐवज लांबविला

चोरीच्या घटना थांबेना! जळगावात बंद घर फोडून ४४ हजाराचा ऐवज लांबविला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२३ । जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाकच शिल्लक नसल्याचे दिसून येतेय. दरम्यान, जळगाव शहरातील प्रजापत नगर परिसरातील पवन नगरमध्ये बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छायाबाई भटू बडगुजर (वय ४४, रा. पवननगर, जळगाव) असे फिर्यादीचे नाव आहे. त्या अष्टविनायक गणपतीच्या दर्शनासाठी मुलीसोबत २९ सप्टेंबर रोजी गेल्या होत्या. तेव्हापासून ते ३ ऑक्टोबर पर्यंत केव्हातरी चोरटयांनी फिर्यादी यांचे बंद घर पाहून तेथे घरफोडी केली. दागिने, मोबाईल असा ४४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविला. फिर्यादी परत आल्या तेव्हा त्यांना घराचा कडीकोंयडा तुटलेला दिसला. त्यांनी आत जाऊन पहिले असता त्यांना घरफोडी झाल्याचे दिसुन आले.

त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि माणिक सपकाळे करीत आहे. चोरटयांनी परिसरातील विश्राम नगरातील पुंडलिक अपार्टमेंट येथे संदीप सुधाकर जोशी यांचेकडे देखील घरफोडी केली आहे. मात्र तेथील किती ऐवज चोरीला गेला, ते कळू शकले नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.