बातम्या

म.स. साखर कारखाना कामगारांचे थकीत रक्कम मिळणेसाठी आंदोलन सुरू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२३। म.स. साखर कामगारांचे कारखान्याकडे भविष्य निर्वाह निधी, पगार व सेवा निवृत्त कामगारांची उपदानाची रक्कम अशीएकूण 52कोटी रूपये थकीत आहेत. कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. सदर थकीत रक्कम मिळणेसा ठी कामगारांनी आजपासून कारखाना गेटवर आंदोलन सुरू केलेले आहे. कामगारांची कारखाना मालकावर असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे.

सदरहू कामगारांनी असे ठरवले की, जोपर्यंत कामगारांना त्यांच्या हक्काचा व घामाचा पैसा मिळत नाही तोपर्यंत सदर कामगार कारखाना सुरू होऊ देणार नाही. कारखाना परिसरात कारखान्याचे काही कर्मचारी ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांच्या बैठका घेत आहेत. तरी शेतकरी बांधवांना कामगार तर्फे विनंती करण्यात येत आहे की, या कारखान्याच्या भरवश्यावर शेतकरी बांधवांनी ऊस लागवड करू नये, अन्यथा नुकसान सहन करण्याची वेळ येईल.

आंदोलनामध्ये प्रशासक गवळी साहेब यांनी येऊन मार्गदर्शन केले. तसेच वकील उदय चौधरी, हजर होते. तसेच कामगार युनियनचे अध्यक्ष किरण चौधरी, जनरल सेक्रेटरी सुनिल कोलते, उपाध्यक्ष ज्ञानदेव जावळे, हेमंत इंगळे, राहुल नेमाडे, एकनाथ लोखंडे, गिरीश कोळंबे, युनियनचे सर्व पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी जवळपास ४०० ते ५०० संख्येने कामगार सहभागी झालेले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button