जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२३ । जळगाव गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाला नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या व्हाइट कोट समारंभ शनिवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित केला आहे.
यांची राहणार उपस्थिती?
महाविद्यालयातील डॉ. केतकी पाटील हॉलमध्ये आयोजित सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील, हृदयविकार तज्ञ डॉ. वैभव पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस. आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, समन्वयक डॉ. शुभांगी घुले यांची उपस्थीती राहणार आहे.
या समारंभात नव्यानेच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पांढरा कोट अर्थात डॉक्टरांनी घालावयाचे अॅप्रन मान्यवरांच्याहस्ते दिले जाणार आहे. हा कार्यक्रम भावी डॉक्टरांसाठी खुपच महत्वपूर्ण समजला जातो. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह पालकांचीही उपस्थीती राहणार आहे.