जळगाव लाईव्ह न्यूज | २४ सप्टेंबर २०२३ । एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना एकच घरात सर्व पदे पाहिजे. कुटुंबापुरताच त्यांचा पक्ष आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली होती. आता या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले खडसे?
गिरीश महाजन यांच्या घरात गेल्या 30 वर्षांपासून पत्नी साधना महाजन या सरपंचनंतर जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष झाल्या. गिरीश महाजन हे स्वतः गेल्या २० वर्षांपासून आमदार आहे, मग त्यांनीही इतरांना संधी द्यावी, असा टोला खडसे यांनी लगावला.
मंत्री गिरीश महाजन यांना कशाला घरात आमदारकी आणि नगराध्यक्ष पद पाहिजे. त्यामुळे त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. गावीत, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे अशी भाजपमध्ये एकच घरात पदे असल्याची अनेक उदाहरणे आहेत ते महाजन यांना दिसत नाही का..? असंही खडसे म्हणाले
दरम्यान, संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश भाऊ यांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी केले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटलेला नाही. धनगर आरक्षणातही गिरीश भाऊंनी मध्यस्थी केली मात्र तो सुद्धा प्रश्न सुटलेला नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळालेला नाही, अशी खोचक टीकाही खडसे यांनी महाजन यांच्यावर केली आहे.